सगळ्यांची विमाने जमिनीवर येतील, छगन भुजबळांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता फेटाळली

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सध्या ते त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांची गाठीभेटी आणि सभा सुरू आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 16 Sep 2024
  • 04:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सध्या ते त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांची गाठीभेटी आणि सभा सुरू आहेत. अशा वेळी त्यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल. सध्या सर्वच जण हवेत आहेत. पण हे त्यांचे विमान विधानसभा निवडणुकीनंतर जमिनीवर येईल. हा टोला नक्की कोणाला होता याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.  

छगन भुजबळ हे महायुतीतले मोठे नेते आहेत. सध्या ते युती सरकारमध्ये मंत्री आहेत. लोकसभा निवडणूक त्यांना लढवायची होती. पण जागा न सुटल्याने त्यांना उमेदवारीही मिळाली नाही. त्यानंतर राज्यसभेवरही त्यांना जाता आले नाहीत. त्यानंतर भुजबळ हे थोडे मतदारसंघापुरते मर्यादित झाले. त्यांच्या भूमिकेला महायुतीतल्या घटक पक्षाने विरोधही दर्शवला. जास्तीत जास्त जागा महायुतीत मिळाव्यात यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. शिवाय काही सर्व्हेही समोर आले आहेत.  विधानसभा निवडणुकीचे जे सर्व्हे समोर येत आहेत त्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार टक्कर होणार हे स्पष्ट आहे. काही सर्व्हे  महायुतीचे सरकार येणार असे सांगत आहेत. तर काही सर्व्हेत महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसत आहेत. या बाबत छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने असे विविध पक्षाचे वेगवेगळे आकडे फिरणारच आहेत. सर्वच म्हणतात आम्ही पुढे आहोत. ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागतील, त्यावेळी सर्वांचे विमान खाली येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्यामुळे हे विमान नक्की कोणाचे खाली येणार याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीला हा टोला होता की महायुतीला हा टोला होता याचीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. दरम्यान महायुतीच्या घटक पक्षात काही मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत हे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल, असे भुजबळ  म्हणाले. छगन भुजबळ हे महायुतीकडून येवल्यातून पुन्हा एकदा मैदानात असतील हे निश्चित आहे. सध्या ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र ते पक्षात सध्या नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ पहिल्या एवढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचे दिसत नाही अशीही चर्चा आहे. ते मतदारसंघात असतात. राज्याचा मोठा नेता म्हणून त्यांचा उल्लेख होतो. पण राज्यस्तरावर ते फिरताना सध्या दिसत नाहीत. शिवाय लोकसभा आणि राज्यसभेला डावलले गेल्यानेही ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ते मनोज जरांगे पाटील यांनाही आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षातील एक गट भुजबळांच्या विरोधात गेला आहे. म्हणूनच कदाचित निवडणुकीनंतर सर्वांचे विमान जमिनीवर येईल, असे वक्तव्य भुजबळांनी केल्याची चर्चा आहे. 

जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली
छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील पिंपळस ते येवला चौपदरीकरण आणि चांदवड हद्दीतील लासलगाव विंचूर व म्हसोबा माता ते धारणगाव खेडला झुंगे या रस्त्याचे ६९४ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी भाषण सुरू असताना मध्येच हनुमान चालीसा सुरू झाली. तेव्हा भुजबळ यांनी मंदिर प्रशासनाला आवाज कमी करा, अशी विनंती केली. मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा, पण आवाजात भाषण कसे करणार? पोलीस इन्स्पेक्टर तेवढी दखल घ्या, असेही भुजबळांनी म्हटले आहे. नंतर भुजबळांनीच जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, अशी घोषणाही दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest