NCP : शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार ?

शरद पवार (Sharad Pawar) हे लोकसभेच्या (Loksabha) 14 ते 15 जागा लढवणार असल्याची माहिती जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून कार्यकर्त्याना पुण्यात देण्यात आली आहे. पुण्यातील निसर्ग कार्यालय येथे शरद पवार गटाची (NCP) मोठी बैठक पार पडत आहे.

NCP

शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार ?

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) हे लोकसभेच्या (Loksabha) 14 ते 15 जागा लढवणार असल्याची माहिती  जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून कार्यकर्त्याना पुण्यात देण्यात आली आहे. पुण्यातील निसर्ग कार्यालय येथे शरद पवार गटाची (NCP) मोठी बैठक पार पडत आहे. अजित पवार यांनी काल एक बैठक घेत यामध्ये लोकसभेच्या शिरूर,बारामती,रायगड व सातारा या जागा लढवणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी देखील एक मोठी बैठक बोलावली आहे.

या बैठकीत जयंत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आवाहन केले आहे. येत्या मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करा असे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. यानंतर आता शरद पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही एका जागेवर आपले दावे केले आहेत यामुळे येत्या निवडणुकीत पवार वर्सेस पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे असे चित्र दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest