अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार? काय आहे नेमकं कारण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Tue, 4 Jul 2023
  • 10:51 am
Amol Kolhe  : अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार? काय आहे नेमकं कारण...

संग्रहित छायाचित्र

सिल्वर ओकवर शरद पवारांची अमोल कोल्हे घेणार भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी ३० ते ४० आमदारांसोबत शिंदे सरकारमध्ये जात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा बंड पुकारला. या बंडा नंतर कोण कुठे जाणार याबाबत मोठा संभ्रम राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळत होता. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे अमोल कोल्हे. रविवारी अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी अमोल कोल्हे हे राजभवनात उपस्थित होते आणि त्यानंतर आता शरद पवारांसोबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी अजित पवारांसोबत राजभवनात असणाऱ्या अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्यासोबत घोषणा केल्याने चर्चेला उधाण आल्याचे दिसत आहे. याबद्दल अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रविवारी राजभवनामध्ये गेलो तेव्हा अजित पवारांकडे एक काम होते, त्या कामानिमित्त गेलो होतो. बंडामध्ये मी सहभागी नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा घडामोडी बघता आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांनाकडे सादर करणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

या निर्णयामागचे मोठे कारण असे की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी जे मतदान केले होते ते मतदान हे एका विचारधारेवर विश्वास ठेवून केले होते आणि आता त्यामध्ये विश्वास तुटू नये, यासाठी मी माझ्या खासदार पदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. आज अमोल कोल्हे शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवारांची भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest