Maratha Reservation : मराठा आरक्षणावर शरद पवारांना प्रश्न का विचारात नाही, विखे पाटलांचा सवाल

शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात १५ वर्षे मंत्री होते. त्याच्या कालखंडात मराठा समाजासाठी (Maratha reservation) त्यांचे काय योगदान आहे हे जाहीर करावे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मुद्द्यावर भाष्यच (Pune News) करायचे नाही असे शरद पवारांनी ठरविले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 28 Oct 2023
  • 07:28 pm
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर शरद पवारांना प्रश्न का विचारात नाही, विखे पाटलांचा सवाल

मराठा आरक्षणावर शरद पवारांना प्रश्न का विचारात नाही, विखे पाटलांचा सवाल

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात १५ वर्षे मंत्री होते. त्याच्या कालखंडात मराठा समाजासाठी (Maratha reservation) त्यांचे काय योगदान आहे हे जाहीर करावे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मुद्द्यावर भाष्यच (Pune News) करायचे नाही असे शरद पवारांनी ठरविले आहे. तरी त्यांना कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. फक्त सरकारला बदनाम करण्याच षडयंत्र विरोधी पक्षाकडून रचले जात आहे, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, पवारांनी आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले? त्यांनी मागे जो निर्णय घेतला त्याचे परिणाम आज मराठा समाज भोगत आहे. कधी तरी त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसनेही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसच दुट्टपी धोरण आहे. तेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आहे. सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहेत त्यात काही चर्चा होईल. आम्ही दिलेले आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले.  त्यांना त्या विषयाचे गांभीर्य नव्हते. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरेंनी कधी मराठा आरक्षणाविषयी शब्द काढलेला आठवत नाही. उलट सामनातून टीका करण्यात आली. फक्त हवा द्यायचे काम चालू आहे. माझे जनतेला आवाहन आहे आणि जरांगे पाटील यांना विनंती आहे की सरकारने प्रामाणिकपणे आरक्षण देण्याचं काम केले आहे.  त्यांच्याबद्दल रान उठवण्याच काम केले जात आहे. जरांगे पाटील यांनी त्यांच्या या प्रयत्नाला बळी पडू नये. जरांगे यांची भूमिका प्रमाणिक आहे. आम्ही त्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, ते ज्येष्ठ नेते आहेत. मात्र प्रधानमंत्री बोलतात. त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. वास्तव असल पाहिजे. मंत्र्यांना गाव बंदी करणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्या मागे कुणाचं षडयंत्र असेल असे नाही आज राज्य सरकारच्या मंत्र्याविषयी भूमिका घेतली जात आहे तीच विरोधी पक्षासाठी घेतली जाणार का हा प्रश्न आहे.ज्यांनी आरक्षण घालवलं ते आज उजळ माथ्याने फिरत आहे, हे वास्तव आहे. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला किती महत्व देयच हा प्रश्न आहे. यात्रा सुरू ठेवली काय आणि बंद ठेवली काय माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही, अशी टीका त्यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest