Ajit Pawar : नाना पटोलेंचे शरसंधान म्हणाले, अजित पवारांत एवढी हिंमत कुठे?

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी,

Ajit Pawar

नाना पटोलेंचे शरसंधान म्हणाले, अजित पवारांत एवढी हिंमत कुठे?

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar)  शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही अजित पवार शरद पवारांच्या वयावरून अनेकदा बोलले आहेत. वयाच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अजित पवारांवर शरसंधान साधले आहे. मोदींचे वय झाले आहे, त्यांना निवृत्त व्हायचा सल्ला देण्याची हिंमत अजित पवार कुठून आणणार आहेत? ,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.    

अजित पवारांवर सडकून टीका करताना पटोले यांनी, वयोमानाच्या मर्यादा भाजपने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. अजित पवार यांच्यात जर खरंच हिंमत असेल तर त्यांनी आता पंतप्रधान मोदींना निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावे. मग बघा त्यांचा ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो, ते कळेल. राहुल गांधींची मणिपूरमधून 'भारत न्याय' यात्रा सुरू होत असताना काँग्रेसचा एक नेता शिंदे गटात गेला. अजूनही काँग्रेसचे नेते खेचण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यांनी ८६ वर्षीय सुशीलकुमार शिंदेंना पक्षात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे वयोमानाच्या मर्यादा भाजपाने इतरांसाठी लावल्या आहेत. पण त्यांनी स्वतः पद सोडलेले नाही. सोशल मीडियावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली त्या व्हीडीओत पाहायला मिळत आहे.

त्यांच्या बुद्धीची किव वाटते

आम्ही रुबाब करणारी माणसं नाहीत. आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री; असे आम्ही एका गाडीतून जाणार होतो. परंतु ऐनवेळी आमचे सहकारी सोबत आले. त्यामुळे गाडीमध्ये अडचण झाली. असा व्हीडीओ व्हायरल करणाऱ्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमातच ठरले होते की कुणी कोणत्या गाडीत बसायचे. परंतु ऐनवेळी गडबड झाली. आम्ही सगळ्यांना सामावून घेणारी माणसं आहोत. असा चिमटा अजित पवारांनी काढला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest