Politics : आम्ही म्हणतोय तेच खरे, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार

आम्हीं म्हणतोय तेच खरे, तुम्ही कोण ठरवणारे, आम्ही कोर्टाच बघु, आम्ही तिघे बसू पक्ष आणि निर्णय घेऊ कुठेही अडचण येणार नाही, काही अडचण येईल अस वाटत नाही, असा दावा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी म्हणजे आपणच असल्याचे स्पष्ट केले.

Politics : आम्ही म्हणतोय तेच खरे, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार

आम्ही म्हणतोय तेच खरे, आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार

शुक्रवारी अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. आम्हीं म्हणतोय तेच खरे, तुम्ही कोण ठरवणारे, आम्ही कोर्टाच बघु, आम्ही तिघे बसू पक्ष आणि निर्णय घेऊ कुठेही अडचण येणार नाही, काही अडचण येईल अस वाटत नाही, असा दावा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी म्हणजे आपणच असल्याचे स्पष्ट केले. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. अशातच अजित पवार गटाची शुक्रवारी बैठक झाली. याबाबत प्रश्न विचारताच अजित पवार यांनी संताप व्यक्त करत आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, जसे तुमच्या क्षेत्रात आहे, तसे आमचे आहे. तत्व कोणी गुंडाळले आहेत, उगाच ध चा म करू नको, देश स्वतंत्र पासून इतिहास पाहिला तर कळेल, वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्रित आलेली पहिली आहेत, त्या त्या वेळेसची राजकिय परीस्थिती बघून निर्णय जगाच्या देशाच्या आणि राज्याच्या महापालिकेच्या पातळीवर घेतले जात आहेत. तसे निर्णय घेतले तर काहीच हस्तक्षेप घेतला नाही पाहिजे.

अयोध्येतील राम मंदीराचे उद्घाटन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, मला अजूनपर्यंत राम मंदिर उदघाटन आमंत्रण आले नाही, आलं तर जाण्याचा जरूर विचार करेन, सर्व धर्म समभाव मानणारे आहेत, मी पण सकाळी दगडूशेठ आरती केली, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

मराठा आरक्षणाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, कोणी काही मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सरकारला नियमात आणि कायद्याच्या चौकटीत बसेल. त्याच गोष्टी कराव्या लागतात, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण टिकल नाही, फडणवीस यांनी अभ्यास करून आरक्षण दिलेले टिकले, पण पुढे ते हाय कोर्टत टिकल नाही, आता तिसऱ्यांदा आरक्षण देताना टिकावू आरक्षण दिले पाहिजे, त्यामुळे विलंब लागत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest