छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक

राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 11 Jul 2023
  • 10:25 am
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला महाडमधून अटक

दारुच्या नशेत धमकी दिल्याची माहिती

राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्या तरुणाला पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

प्रशांत पाटील (मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ सोमवारी (१० जुलै ) पुण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला. धमकीचा दूरध्वनी आल्यानंतर पुणे पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तातडीने तपास सुरु केला. भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा दुरध्वनी करणारा तरुण महाड परिसरात असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली.

त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने पाटील याला महाड परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीने दारुच्या नशेत भुजबळ यांच्या कार्यालयात संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest