पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर अपक्ष म्हणून लढू

पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष म्हणून लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.

Ramraje Naik Nimbalkar

पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर अपक्ष म्हणून लढू

कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खुले आव्हान

सातारा : पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष म्हणून लढू, असे खुले आव्हान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले विरोधक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे. कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते नाईक महादेव पवार आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, कार्यकर्ता हा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. मतदारसंघातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. भाजपाचा आधार घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा, दबावाचा प्रयत्न करून खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबले जात आहे. ही स्थिती आता सहन करण्यापलीकडे गेली आहे. आज तुम्ही अजित पवारांना सोडून चाललाय का, असा प्रश्न मला अनेकांनी केला. त्यावर बरीच चर्चा झाली. ही चर्चा सर्वत्र पसरली

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख टाळून ते म्हणाले, कदाचित ही बातमी विरोधकांनीच दिली असावी. त्यांना असल्या अफवा पसरवण्याची घाणेरडी सवय आहे. जर महायुतीतून रामराजांची ब्याद गेली, तर कमळाच्या चिन्हावर उभे राहण्यास आम्ही मोकळे असे त्यांना वाटत असेल. त्यांनी भाजपाचा आधार घेऊन पोलीस प्रशासनाला बरोबर धरून माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आणि तुरुंगात डांबण्याचा उद्योग सुरू केला आहे. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. जर त्यांना निवडणुकीची एवढीच खुमखुमी असेल तर पक्ष विसरा, तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या अपक्ष लढू.

रामराजे म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांवर वारंवार येत असलेल्या दबावामुळे आज त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्या भावना आपण अजित पवारांच्या समोर मांडणार आहोत. ते योग्य निर्णय घेतील. आजवर मी सांगत होतो, ते कार्यकर्ते ऐकत होते. आता कार्यकर्ते मला सांगत आहेत. हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. जर कार्यकर्त्यांनी काही ठरवलेच तर मी काही बोलू शकणार नाही, अशी वेळ पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी माझ्यावर येऊ देऊ नये. कार्यकर्त्यांची सुरक्षितता व विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण शरद पवार यांना दुखवून अजित पवारांकडे गेलो. फलटण तालुक्याच्या इतिहासामध्ये आजवर चौथ्यांदा आमदारकीची संधी कोणालाही मिळालेली नाही. ती आम्ही आणि अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना दिली आहे. ते कुठूनही उभे राहिले तरी भरघोस मतांनी निवडून येतील, त्यांनी मतदारसंघाची संस्कृती जपावी. यावेळी संजीव राजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण आदींची भाषणे झाली. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest