Thackeray-Fadanavis Meeting : ... तर शिवसेना दुभंगली नसती; दीपक केसरकरांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. नैसर्गिक मित्रपक्षांबरोबरची युती तोडली.आधीच फडणवीसांसोबतची मैत्री जपली असती तर आज शिवसेना दुभंगली नसती

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 18 Dec 2024
  • 05:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. नैसर्गिक मित्रपक्षांबरोबरची युती तोडली.आधीच फडणवीसांसोबतची मैत्री जपली असती तर आज शिवसेना दुभंगली नसती, अशा शब्दांत शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.      

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंनी मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर केसरकारांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आधीच अशी भेट घेतली असती तर शिवसेनेचे दोन भाग झाले नसते, असे सांगत केसरकर म्हणाले की, आधी देवेंद्र फडणवीस यांचे फोनही उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला. एकनाथ शिंदे यांची दुसरी कोणतीही मागणी नव्हती. एकनाथ शिंदेंची एकमेव मागणी होती की आपण हिंदुत्वाचा विचाराबरोबर जाऊ. काँग्रेसबरोबर जायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली असती तर हे सर्व घडलेच नसते. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना कितीतरी फोन केले होते. पण आता खूप उशीर झाला. आता महायुतीचे सरकार आले आहे. सरकार चांगले चालले पाहिजे. यावर नेहमी चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा मोठ्या आहेत. सरकार चांगले चालवण्यासाठी काही सूचना असतात. त्यामुळे ते (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देत असतात. महाराष्ट्रात मी जवळपास अडीच वर्ष शिक्षण खाते सांभाळले. मुलांच्या हितासाठी जे काही चांगले निर्णय घेतले. ते निर्णय तसेच सुरु राहिले पाहिजेत. कारण आपल्याला पुढची पिढी चांगली घडवायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही महाराष्ट्राच्या विकासाची दृष्टी असल्याचेही केसरकरांनी नमूद केले आहे.

Share this story

Latest