संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे पद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आलं आहे.
मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही पालकमंत्रीपदांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये गडचिरोलीचे पालक मंत्री पद माझ्याकडेच ठेवु इच्छितो, असं विधान केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीमध्ये बदलाचे वारे वाहु लागले आहे. नक्षलग्रस्त आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मोठ मोठे प्रकल्प सुरु होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक राजकारण्यांचे लक्ष गडचिरोलीने वेधलं आहे. नक्षलग्रस्त आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात मोठ मोठे प्रकल्प सुरु होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक राजकारण्यांचे लक्ष गडचिरोलीने वेधलं आहे.
गडचिरोली हा भाग अतिदुर्गम असल्याने तसेच त्याठिकाणी नक्षवाद्यांची समस्या गंभीर असल्याने अनेक नेते त्याकडे दुर्लक्ष करत होते. कोणीही गडचिरोलीचे पालकत्व घेण्यास इच्छुक नसायचे. मात्र, तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पुढाकार घेत गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर येथे नक्षलवादविरोधी कारवाया आणि विकास कामांना गती मिळाली. आर.आर. पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी स्विकारली. यादरम्यान जिल्ह्यातील लोहखनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प सुरु झाले. तसेच, नक्षलवादावर दबाव टाकण्यात यश मिळाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.