संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसांपासून राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे हत्याप्रकरण चांगलेच गाजत आहे. दरम्यान, जिंतेंद्र आव्हाड यांचे काही व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत व्हायरल होणारे चॅट खोटं असल्याचे म्हटलं आहे. आव्हाड यांचे व्हायरल होणाऱ्या चॅटमुळे देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच,
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबरला बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान रुपाली ठोंबरे यांनी आव्हाड यांचे काही व्हाट्सअप चॅट ट्विटरवर शेअर करत निशाणा साधला आहे.
ट्विटमध्ये रुपाली ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या?
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर द्या जितेंद्र भाऊ. अशा आशयाची पोस्ट करत ठोंबरे यांनी याप्रकरणी आव्हाड यांचे व्हाट्सअप चॅट शेअर केले आहेत.
आव्हाड यांच्या व्हाट्सअप चॅटमध्ये नेमकं आहे तरी काय?
उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे...मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव...तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका...आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं...कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान आव्हाड यांनी कथित चॅट असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करत कर नाही और डर कशाला असं विधान केलं आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
माझा खोटा वाॅटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?
फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ' चौकशी सुरू आहे' , हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी म्हणून सातत्याने वाल्मिकी कराड याचे नाव समोर येत आहे. अशातच वाल्मिकी कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे खास संबंध असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी यासंदर्भात काही पुरावेदेखील सादर केले होते.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड.
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 28, 2024
उत्तर दया जितेंद्र भाऊ@Awhadspeaks
माहितीसाठी -@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @DGPMaharashtra pic.twitter.com/3ANGzS6lI1