संग्रहित छायाचित्र
राज्यातील विधानसभा निवडणुक नुकत्याच पार पडल्या. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. पण या निवडणुकीत झालेला पराभव महाविकासआघाडीतील नेत्यांना पचवण जड जात असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विरोधीपक्षाने ईव्हिएमवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच, शरद पवार पक्षाच्या आमदारने नुकतचं खळबळजनक विधान केलं आहे. अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
उत्तमराव जानकर यांनी काही तासांपूर्वीच शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले उत्तमराव जानकर?
विधानसभा निवडणुक निकालामध्ये मोठी गडबड आहे. या सरकारने या निवडणुकीत जवळपास दीडशे मतदार संघामध्ये गडबड केली आहे. त्यामुळं व्हीव्हीपॅटमधून जी पावती बाहेर येते, ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकले, अशी परवानगी देण्याची मागणी जानकर यांनी केली.
तसेच त्यांनी बारामती मतदारसंघावर भाष्य केलं. या मतदारसंघाची खोलपर्यंत चौकशी केली असता अजित पवार २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून असून मतदारसंघांमध्ये अजित पवार यांना एक लाख 80 हजार मिळाली आहेत. त्यापैकी एक तृतीयांश प्रपोर्शन इथे देखील लावलेलं होतं, त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत ऐंशी हजार अधिक साठ हजार अशी एक लाख 40 हजार आहेत. त्यातील 60000 मते वजा होतात, त्यानंतर 1 लाख 20 मतांवरती अजित पवार राहतात.
अजित पवार यांचे फक्त 12 आमदार या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे 107 आमदार निवडून आलेले आहेत असं वक्तव्य उत्तमराव जानकर यांनी केले आहे.
जानकर यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळं जानकर यांच्या या वक्तव्यावर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.