Ramdas Athwale : राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊन काहीच फायदा होणार नाही, मी असताना त्यांची काय गरज, रामदास आठवलेंचं मोठं विधान

देशभरात लोकसभा निवडणूकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहे. अनेक पक्षांकडून निवडणूकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच मनसे भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.

Ramdas Athwale

राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊन काहीच फायदा होणार नाही, मी असताना त्यांची काय गरज, रामदास आठवलेंचं मोठं विधान

देशभरात लोकसभा निवडणूकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहे. अनेक पक्षांकडून निवडणूकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच मनसे भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळातून समोर आली आहे. दिल्लीत चर्चा झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जातंय. यावरून रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)  हे महाराष्ट्राचे नेते आहेत. पण ते महायुतीमध्ये येणार नाहीत. जर ते आले तरी त्यांना घेऊ नये. ते स्वतंत्र लढ्यामध्येच त्याचा फायदा आहे.त्यांना महायुतीमध्ये घेऊन ही भाजपाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरे यांची काही गरज नाही असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale)  यांनी व्यक्त केले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मी राज्यसभेतील खासदार असलो तरीही लोकसभेचा माणूस आहे, असं म्हणत आम्हाला एकही जागा मिळाली नाही तर आम्ही जनतेसमोर तोंडही दाखवू शकणार नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. यावरून तेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मनसे महायुतीत येणार का असा प्रश्न विचरला असता  त्यांनी थेट राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेऊ नका….राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेतल्याने महायुतीला काही फायदा होईल असं दिसत नाही. मी असताना तसं राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही, राज ठाकरे लोकप्रिय नेते आहेत त्यांचा स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे , असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते लातूर येथे माध्यमांशी बोलत होते. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest