संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पुण्यात झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना राज्यमंत्री पद देण्याची विनंती ठरावाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वा वर्धापनदिन असून पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या उपस्थितीत ठराव मांडला गेला. या ठरावात सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ व पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल, असे म्हटले गेले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.