श्याम मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांचा गौप्यस्फोट; म्हणाले, अनिल देशमुखांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या हाती

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही असं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 24 Jul 2024
  • 07:59 pm
Devendra Fadnavis, Shyam Manav

संग्रहित छायाचित्र

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. माध्यमांशी बोलताना  देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले. मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही असं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे घुसलेले आहेत. दुर्दैवाने श्याम मानव हे या सुपारीबाजांच्या नादाला शाम मानव लागले का हे पाहावं लागेल.

फडणवीस पुढे म्हणाले, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यावर आमचं सरकार नव्हतं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टीस यांच्या समोर लागली. त्यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर करायला लावला. हा एफआयआर महाविकास आघाडीच्या काळात झाला. त्यानंतर ते जेलमध्ये गेले. आणि आता ते बेल वर बाहेर आहेत. ते काही सुटलेले नाहीयेत. १०० कोटींच्या वसूलीच्या केसमध्ये ते जेलमधून बेल वर बाहेर आलेले आहेत. 

फडणवीस म्हणाले, मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो. मी आजपर्यंत बोललो नव्हतो. ते सातत्याने आरोप करतायेत. तरीही मी शांत आहे. मी अशा प्रकारचं राजकारण करीत नाही. परंतु माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर सोडत नाही. त्यांच्याच पक्षातील काही लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात? आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात? याचा माझ्याकडे पुरावा आहे. जर माझ्यावर वेळ आली तर मला ते उघड करावे लागेल. जर रोज खोटे बोलून कुणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest