'राशप' नेते जयंत पाटील यांची टीका; म्हणाले ...तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा !

किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे, कारण भाजपमध्ये गेले तर सर्व चौकश्या थांबतात. त्यामुळे मागे लागलेल्या सर्व कटकटी थांबतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 11:51 am
corruption, slogan, corruption, political news, backtracking conspiracies stop, bjp, Jayant Patil

संग्रहित छायाचित्र

आमच्या २३ नेत्यांविरोधातील चौकश्या लांबल्या

जळगाव: किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले बरे, कारण भाजपमध्ये गेले तर सर्व चौकश्या थांबतात. त्यामुळे मागे लागलेल्या सर्व कटकटी थांबतात. आमच्या २५ नेत्यांवर तुम्ही आरोप केले, नंतर २३ जणांच्या चौकश्या थांबल्या. राज्यातली जनता दूधखुळी आहे का? या सरकारने गेल्या दीड ते दोन वर्षात महाराष्ट्रात खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. मात्र तो लोकांना जाऊन सांगण्याची गरज आहे. 'महायुतीच्या सरकारचे काळे कारनामे' असे पुस्तक आम्ही प्रसिद्ध केले आहे. ते पुस्तक लोकांमध्ये जाऊन लोकांना वाचून दाखवा, असे म्हणत राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यावर मोठे कर्ज आहे. मोठा बोजा आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड बोजवारा या सरकारने उडवला आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र थेट ११ व्या क्रमांकावर गेला आहे. डबल इंजिनमुळे आम्हाला पैसे मिळतात, असे  सरकार सांगते. मात्र हे डबल नाही तर लोकांना त्रास देणारे ‘ट्रबल इंजिन’ आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम राज्यातल्या विमा कंपन्या करत नाहीत. निर्यातीच्या चुकीच्या धोरणाचा फटका हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर बसला. पिकांना हमीभाव नाही यासह विविध समस्यांमुळे शेतकरी नाराज असल्याने त्याचा फटका सरकारला लोकसभा निवडणुकीत असल्याचे आपण बघतो आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest