सोलापूर मार्क्सवाद्यांचा बालेकिल्ला; आडम मास्तरांचा गड का पडला?

सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणूनदेखील ओळखले जाते. सोलापूरच्या चादरी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कामगारांच्या शहराने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेहमीच जनाधार दिला आहे. परंतु जनाधार हा बदलत जाणारा असतो. जसे सोलापूर बदलत गेले तसा सोलापूरचा राजकीय विचारदेखील बदलत गेला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 14 Dec 2024
  • 03:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेश खंडाळे, वरिष्ठ उपसंपादक, सीविक मिरर

सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणूनदेखील ओळखले जाते. सोलापूरच्या चादरी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. या कामगारांच्या शहराने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेहमीच जनाधार दिला आहे. परंतु जनाधार हा बदलत जाणारा असतो. जसे सोलापूर बदलत गेले तसा सोलापूरचा राजकीय विचारदेखील बदलत गेला. कामगारांचे शहर हे बिरुद कारखाने बंद पडल्यानंतर मागे पडले. सोलापूरमधील कामगारांची मुलं नोकरीधंद्यानिमित्त पोटापाण्यासाठी गावाच्या बाहेर पडली. सोलापूर वाढत होतं. परंतु सोलापूरच्या मातीला रोजगार निर्मिती होत नव्हती. नशीब काढायचे असेल तर पुण्या-मुंबईला गावची माती सोडून जाणं हेच नव्या पिढीच्या नशिबी आलं. त्यातूनच सोलापूरमध्ये मागील दोन दशकात नवीन राजकीय विचारदेखील रुजला.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पहिला विजय मिळाला तो सोलापूरमध्ये! लिंगायत समाजाला डोळ्यासमोर ठेवून भाजपने जयसिद्धेश्वर महाराजांना उमेदवारी दिली व निवडूनदेखील आणले. त्यामुळे सोलापूरच्या भूमीत हळूहळू डाव्या विचाराला मागे सारत उजवा विजार रुजला. आणि २०२४ विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र राजेश कोठे यांना १ लाख १० हजार २७८ इतकी मते पडली. त्यांनी ४८ हजार ८५० मतांची आघाडी घेतली. ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल मुसलिमन या पक्षाच्या  फारूक मकबुल शाब्दी यांना मागे सारत एकूण मताच्या ५४.७१ टक्के मते घेत विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाची मते घेणारे नरसय्या आडम यांचा हा चौथा पराभव. आडम (मास्तर) यांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्रातील २०१४ विधानसभा निवडणूक खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अनेक दिग्गज्जांनी या निवडणुकीत आसमान पाहिले त्यापैकी नरसय्या आडम हे एक. अनेकांना या निवडणूक निकालावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर सर्व पक्षीय विरोधक ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून हा विजय मिळविल्याचा आरोप करीत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेस हे राष्ट्रीय पक्ष जसे आमने सामने होते. तसेच एकाच पक्षातून फुटून वेगवेगळे झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट, त्याबरोबरच शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढली. पक्षफुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खूपच चांगली कामगिरी केली होती. परंतु अवघ्या काही महिन्यांमधील महाराष्ट्रामधील जनमत अनेकांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. त्यातून अनेक वर्षांपासून ईव्हीएम वरील संशय उफाळून पुन्हा वर आला आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज पाटील यासारख्या दिग्गजांचे गड या निवडणुकीत पडले. सोलापूरचा मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा असाच एक जुना मजबूत गड या निवडणुकीत कायमचा पडला तो म्हणजे आडम मास्तरांचा!

नरसय्या नारयन आडम यांनी १९७८ मध्ये पहिली निवडणूक लढविली होती. २०२४ चौथ्या पराभवानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. सन १९७८ पासून सोलापूरचे विधानसभेवर त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९५ आणि २००४ मध्ये सोलापूरच्या जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले.  या निवडणुकीनंतर संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा नरसय्या आडम यांनी केली आहे. त्यासाठी सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा सलग चौथ्यांदा पराभव झाला हे कारण अनेक विश्लेषकांना वरकरणी जरी वाटत असले. तरी खरोखरच अशा पराभवांनी खचणारे नरसय्या आडम आहेत का? मग आडम मास्तरांनी असा निर्णय का घेतला असेल.

नई जिंदगीमधील मुस्लीम बहुल मतदार ठरला निर्णायक:

सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते फारुक मकबुल शाब्दी या ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल मुसलिमन या पक्षाला मिळाली आहेत. फारुक शाब्दी यांना ६१ हजार ४२८ इतकी मते पडली. त्यांनी एकूण मताच्या ३०.४८ टक्के मते पडली आहेत. या अगोदरच्या निवडणुकांमध्येदेखील एमआयएम हा निवडणुकीमधील महत्त्वाचा फॅक्टर राहिला आहे.  हा भाग मुस्लीम बहुल आहे. या ठिकाणी पुरुषांबरोबर महिलादेखील मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडत असतात. या परिसरात प्रमुख रस्ते आणि गल्लोगल्ली कार्यकर्ते टेबल टाकून मतदारांना माहिती देतात. म्हणजे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा परिसर आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest