maharashtra politics news
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यांनी अजित पवारांसह पक्षातील इतर नेत्यांना देखील संतप्त सवाल उपस्थित करत डावलण्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी सागर बंगल्याची वाट धरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपली बाजू समजून सांगितली. दरम्यान, भुजबळांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.
नेमकं काय म्हणाले फडणवीस
सध्या मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना फडणवीस यांनी भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले. भुजबळ साहेब हे आपच्या महायुतीचे प्रमुख नेते आहे आहेत. आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयामध्ये त्यांच्यादेखील महत्त्वाचा वाटा आहे. अजित दादादेखील त्यांची चिंता करतात. भुजबळांना डावलण्याचा हेतु अजित पवार यांचा नव्हता. आमचा पक्ष आम्हाला राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे असं अजित दादा म्हणाले होते. त्यामुळं भुजबळ यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं होत. यासर्वामुळ मोठा प्रश्न उभा झाला आहे. यावर आम्ही तोडगा काढू आणि भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे त्यादृष्टीने त्यांचा मार्ग काढला जाईल. असं फडणवीस यावेळी म्हणाले.
40 मिनिटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा?
नाराज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली बाजू मांडली. या भेटीनंतर चर्चेत नेमकं काय बोलणं झालं हे स्वतः भुजबळ यांनी माध्यामांना सांगितलं. फडणवीस यांनी माझ मत समजून घेतलं. त्यांनी मला 8 -10 दिवस वेळ द्या अशी विनंती केली. शांततेमध्ये यावर मार्ग काढू. तसेच ओबीसीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. यासोबत ओबीसीच कोणतही नुकसान होणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेदरम्यान दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.