Maratha Reservation : ‘शरद पवारचं मराठ्यांचा कर्दनकाळ‘; नामदेवराव जाधव यांचा हल्लाबोल

शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या (Maratha Reservation) आयुष्याचे असणारे आरक्षण ओबीसींना दिले आहे. शरद पवारचं (Sharad Pawar) मराठ्यांचा कर्दनकाळ आहे, अशा शब्दात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांनी हल्लाबोल केला. सीविक मिररशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 8 Nov 2023
  • 04:03 pm
Maratha Reservation : ‘शरद पवारचं मराठ्यांचा कर्दनकाळ‘;  नामदेवराव जाधव यांचा हल्लाबोल

‘शरद पवारचं मराठ्यांचा कर्दनकाळ‘; नामदेवराव जाधव यांचा हल्लाबोल

शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या (Maratha Reservation) आयुष्याचे असणारे आरक्षण ओबीसींना दिले आहे. शरद पवारचं (Sharad Pawar) मराठ्यांचा कर्दनकाळ आहे, अशा शब्दात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांनी हल्लाबोल केला. सीविक मिररशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा तिढा पाहायला मिळत आहे. यामुळेच मराठा समाज संतप्त भूमिका घेऊन रस्त्यावर देखील उतरलेला पाहायला मिळाला. परंतु आता मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नामदेवराव जाधव यांनी १९९४ ते १९९५ या काळामध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांवरती घनाघाती टीका केली आहे.

नामदेवराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण देऊन मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती करण्यात आली. या नोकर भरतीच्या संपूर्ण प्रकरणांमध्ये कोट्यावधी रुपयांची हेराफेरी शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेने तपास करून यांच्यावरती कारवाई करावी.

शरद पवार जे स्वतःला मराठा समाजाचे नेते समजतात, परंतू ते मराठा समाजाचे नेते नसून स्वतः ओबीसी आहेत. ओबीसीच्या दाखल्यावरती इथून मागिल सर्व निवडणुका त्यांनी लढवल्या आहेत, असा दावा देखील जाधव यांनी यावेळी बोलताना केला. तसेच छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवून घेतात, त्यांनी मराठा समाजाचा कसा घात केला, यावरती देखील भाष्य त्यांनी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest