आम्ही प्रत्येक मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी किमान १६० जागा जिंकत असल्याचे लक्षात आले, असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे 'सर्व्हेची ऐसी की तैसी' असे म्हणत संजय राऊत यांनी एक्झिट पोलमधीलसर्व दावे फेटाळले आहेत.
आतापासूनच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जिंकून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांना ५० ते १०० कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे.ज्यांना जिंकण्याची खात्री नसते तेच पैसे द्यायला तयार होतात, असा आरोपदेखील राऊत यांनी केला. त्यांना विजयाची अपेक्षा नसती तर त्यांनी पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, असे म्हणत राऊत म्हणाले.