रणसंग्राम २०२४: ‘ट्रिपल इंजिनला भ्रष्टाचाराची चाके’

धाराशीव : संपूर्ण महाराष्ट्र चवताळलेला असून तो आता निवडणुका होण्याची वाट बघतो आहे. भारतीय जनता पक्षाला संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. शिवसेना संपणार नाही. ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लावलेली आहेत.

Uddhav Thackeray

संग्रहित छायाचित्र

उद्धव ठाकरे यांची भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका

धाराशीव : संपूर्ण महाराष्ट्र चवताळलेला असून तो आता निवडणुका होण्याची वाट बघतो आहे. भारतीय जनता पक्षाला (BJP) संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. शिवसेना संपणार नाही. ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लावलेली आहेत. मोदीजींनी (PM Narendra Modi) ‘मेरा परिवार‘ म्हटलंय, पण या भ्रष्ट परिवाराची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा (Uddhav Thackeray Jansamvad Daura) करत असून आज त्यांनी धाराशीव, औसा मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या. ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पलटवार केला.

७० हजार कोटींच्या जलसंधारण घोटाळ्याचा आरोप असणारे उपमुख्यमंत्री होत असतील तर मुख्यमंत्र्यांचा हिशोब कुणाला माहिती, असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या आता लक्षात आलं आहे, महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालू शकत नाही. मोदी खोटा सिक्का आहे, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. निवडणूक रोख्यांमधून भाजपने हजारो कोटी जमवले. असे असेल तर देशाला लुटलं कुणी? घटनाबाह्य सरकारसारखी ८४ कोटी रुपयांची जाहिरात करण्यापेक्षा, त्या पैशात मी माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला असता. ज्या ज्या वेळी पाठीवर वार होतो, त्या त्यावेळी दुश्मनाचा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. ‘नमो महारोजगार’ मेळावा म्हणजे इतर पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये घ्यायचे आणि त्यांना कामाला लावायचे, असा प्रकार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

२०४७ साली आपला देश जगातील सर्वात बलवान देश असेल, अशी घोषणा भाजप करत आहे. २०४७ यायला किती वर्ष आहेत. २०४७ साल तुम्ही बघणार आहात का? कशाला सांगताय २०४७, आता काय देताय ते बोला. गरिबाच्या घरी दोन वेळचं खायला अन्न नाही, अन् २०४७ चे स्वप्न कशाला दाखवता, असा प्रश्न करून उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांना ५० खोके अन् शेतकऱ्यांना काहीच नाही. नमो रोजगार महामेळावा म्हणजे इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वत:च्या पक्षात घ्यायचं आणि कामाला लावायचं. ७० हजार कोटी घोटाळ्याचा ज्यावर आरोप केला, त्याला उपमुख्यमंत्री केलं असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल याचे गणित मला कळत नाही. कितीही भ्रष्टाचार करा, कितीही खा, भाजपात या, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही मोदी गॅरंटी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest