Pune : छगन भुजबळांची इंदापूरमध्ये 9 डिसेंबर रोजी होणार सभा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडत आहेत. मात्र, छगन भुजबळ यांची पुणे जिल्ह्यामध्ये तोफ धडाडणार आहे.

Pune : छगन भुजबळांची इंदापूरमध्ये 9 डिसेंबर रोजी होणार सभा

संग्रहित छायाचित्र

पुणे : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा धडाडत आहेत. मात्र, छगन भुजबळ यांची पुणे जिल्ह्यामध्ये तोफ धडाडणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे त्यांच ९ डिसेंबर रोजी सभा होणार आहे.

छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा होणार असून त्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरीमध्ये रॅली काढून त्यांचे जंगी स्वागत पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी पुणे येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमास छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत.

पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने सभा घेण्याची देखील मागणी यावेळी करण्यात येणार आहे. ओबीसी व मराठा समाज प्रत्येक गावात एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत असताना मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे अशी देखील मागणी पुरंदर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest