Maratha Reservation : सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध – छगन भुजबळ

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको, अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 6 Nov 2023
  • 05:53 pm
Maratha Reservation : सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध – छगन भुजबळ

सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा विरोध – छगन भुजबळ

तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसात कसे मिळाले. 13 हजार पुरावे मिळाले म्हणता?, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा (Maratha Reservation) घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको, अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केली.

बीडच्या जाळपोळीच्या घटनेनंतर छगन भुजबळ हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्व जाळपोळीची पाहाणी करुन छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषद घेतली. भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही. मात्र, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी आहे. ओबीसीमध्ये अनेक छोटे-छोटे जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यास कोणालाही याचा फायदा होणार नाही. आमची जी भूमिका आहे तीच शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाची आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले त्यावेळी जो लाठीचार्ज झाला, त्यात पोलीस जखमी झाले. त्यांची बाजू पुढे आले नाही. ७० पोलीस जखमी झाल्यावर काय करणार. त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून, त्यांनी काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. त्यांचं उपोषण सोडण्यासाठी एक न्यायमूर्ती जात असतील, तर आम्हला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात”, असे भुजबळ म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest