रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 11 Jul 2023
  • 03:29 pm
रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

रुपाली चाकणकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्या आक्षेपार्ह टिप्पणी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे सायरब पोलीसांत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी सुप्रिया सुळे बोलत असताना ५ जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करत कमेंट केल्या होत्या. चाकणकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. रुपाली चाकणकर यांच्यासह चित्रा वाघ यांच्याविषयी अश्लील प्रतिक्रिया नोंदवण्यात आली असून त्यांच्या छायाचित्रात छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ सह भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३५४ (a) आणि ५०९ अंतर्गत सात अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest