Politics News : आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था येतेय – छगन भुजबळ

प्रत्यक्षरीत्या मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे यांच्यावरती ठेवला लावलेला पाहायला मिळाला आहे ‘इथून पुढे इथून मागच्या काळामध्ये महापुरुषांनी देशातील राज्यातील वर्णव्यवस्था संपवण्यासाठी विविध काम केलेले पाहायला मिळाली परंतु आता नवीन वर्णव्यवस्था तयार झालेली पाहायला मिळते

Politics News : आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था येतेय – छगन भुजबळ

आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था येतेय – छगन भुजबळ

पुण्यातील महात्मा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज मंत्री छगन भुजबळ आलेले होते. यावेळी समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा समता पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर छगन भुजबळ यांनी भाषण केले होते. यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मराठा समाजाचे नेते म्हणून जरांगे यांच्यावरती ठेवला लावलेला पाहायला मिळाला आहे ‘इथून पुढे इथून मागच्या काळामध्ये महापुरुषांनी देशातील राज्यातील वर्णव्यवस्था संपवण्यासाठी विविध काम केलेले पाहायला मिळाली परंतु आता नवीन वर्णव्यवस्था तयार झालेली पाहायला मिळते त्या लोकांकडून एकमेकांची लायकी काढली जाते तसेच अनेक आरोप दोन समाजांमध्ये केले जात आहेत‘ असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

भुजबळ म्हणाले की, आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली आहे. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जात आहे. काही दिवसांपूर्वी वाटलं होतं की वर्णव्यवस्था संपली. पण उष:काल होता होता काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. कुठल्याही समाजाच्याविरोधात कोणी असू नाही. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तो सहन देखील केला नाही पाहिजे.

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळया वैचारिक छावण्यांमधील लोकांनी महात्मा फुलेंना गौरवले. भिडे वाड्याचे काम मार्गी लागेल असं वाटते. महात्मा फुलेंच्या या वाड्याच्या आजूबाजूला स्मारक उभारणीसाठी काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागणार नाही असे वाटते, असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest