नवी दिल्ली : ऑफर कोणी दिली, याबाबत कोणाचेही नाव घ्यायचे नाही

विरोधी नेत्यांनी आपणाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ऑफर कोणी दिली हे सांगणे उचित नाही.

Prime Minister, Narendra Modi, Union Minister, Amit Shah, NCP, Sharad Pawar Party, State workers, Removing defects, Integration

File Photo

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पंतप्रधानपदाबाबत स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विरोधी नेत्यांनी आपणाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याबाबत एका कार्यक्रमात  बोलताना गडकरी यांनी ऑफर कोणी दिली हे सांगणे उचित नाही. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही असे स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांचं नाव सतत पंतप्रधानपदासाठी चर्चेत असतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या समर्थकांनी गडकरी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, आपणाला निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाची ऑफर विरोधी पक्षाने दिली होती, या विधानावर गडकरी यांनी सविस्तर उत्तर दिले.

ही ऑफर कोणी दिली होती, या प्रश्नावर ते म्हणाले, आजच नाही तर अनेकदा मला खूप लोकांनी अशी ऑफर दिली आहे. आपल्या देशाची समस्या विचारभिन्नता नसून विचारशून्यता आहे, असे मी पत्रकारांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात सांगितलं होतं. मी आणीबाणीनंतर राजकारणात आलो आहे. मी माझ्या विचारधारेशी कधीच तडजोड करणार नाही.

त्यामुळे पंतप्रधानपदाची ऑफर मला जेव्हा दिली तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही मला का पंतप्रधान बनवू इच्छिता? पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. अशा ऑफर मला निवडणुकीआधी आणि नंतरही आल्या. त्यांच्या ऑफरवर विचार करण्याचा प्रश्नच नाही. मी माझ्या विचारधारेशी तडजोड करत नाही.

तुम्हाला शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यातील कोणी ऑफर दिली होती? तुमचे सर्वपक्षीय संबंध आहेत, त्यामुळे कोणी ऑफर दिली? केंद्रातील नेत्याने ऑफर दिली होती की राज्यातील नेत्याने ऑफर दिली होती? असे अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, मी चौकात उभा नाही. ऑफर कोणी दिली हे सांगणं उचित नाही. मला कोणाचं नाव घ्यायचे नाही. तुम्ही कितीही विचारलंत तरीही मी सांगणार नाही. मी कधी कोणाकडे काही मागायला गेलो नाही. मी आहे त्यात समाधानी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळेल का? असं विचारलं असता ते म्हणाले, मी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. तुम्ही मोदी यांना प्रश्न विचारू शकता. माझे आणि मोदींचे नाते खूप चांगले आहे.

Share this story

Latest