मेधा कुलकर्णी यांची नाराजी फक्त ट्विटर व फेसबुक पुरतीच ?

कार्यक्रमाची तयारी जरी आधीपासून सुरू झाली असेल तरी मेधा कुलकर्णी यांना काही निमंत्रण मिळाले नव्हते. यानंतर आपला राग व्यक्त करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक व ट्विटरवर आपले मत मांडले होते. याचीच प्रतिक्रिया की काय म्हणून त्यांना शुक्रवारी (उद्घाटनाच्या आदल्या दिवशी) घाईघाईने निमंत्रण देण्यात आले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Mon, 14 Aug 2023
  • 10:23 am
Medha Kulkarni : मेधा कुलकर्णी यांची नाराजी फक्त ट्विटर व फेसबुक पुरतीच ?

मेधा कुलकर्णी यांची नाराजी फक्त ट्विटर व फेसबुक पुरतीच ?

चांदणी चौकातील उड्डालपुलाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली होती नाराजी

पुण्यातील चांदणी चौक हा परिसर कोथरूड मतदारसंघाला लागून असल्याने भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना या चांदणी चौकाच्या पुलाच्या उद्घाटन समारंभासाठी निमंत्रण मिळावे, अशी अपेक्षा होती. मात्र कार्यक्रमाची तयारी जरी आधीपासून सुरू झाली असेल तरी मेधा कुलकर्णी यांना काही निमंत्रण मिळाले नव्हते. यानंतर आपला राग व्यक्त करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक व ट्विटरवर आपले मत मांडले होते. याचीच प्रतिक्रिया की काय म्हणून त्यांना शुक्रवारी (उद्घाटनाच्या आदल्या दिवशी) घाईघाईने निमंत्रण देण्यात आले होते.

"माझ्यावरील कुरघोड्या डावलने याबद्दल मी कधीही जाहीर वाचता केली नाही. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले पण आता दुःख मनात मावत नाही. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूड मधील पत्रके पाहिली वाईट वाटले चांदणी चौक या विषयाचे सर्व श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय आणला कोणी कोथरूडच्या आधुनिक कुठलेच नेते या विषयाशी सहभागी नव्हते सर्वश्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सध्या नेते माझ्यासारख्यांच्या अस्तित्व मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत का? मोदीजी अमित शहाजी पुण्यात येऊन गेले ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून सर्व ठिकाणची पास होते.

मी राष्ट्रपदावर असून विनंती करूनही मत दिला नाही माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते कारण माझ्याकडे हा ना मसल पॉवर न मनी पॉवर मी एका सामान्य कुटुंबातून आलेली निष्ठेणी काम करणारी कार्यकर्ती आहे." असा मेसेज त्यांनी ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केला होता.

हे सर्व झाल्यानंतर मेधा कुलकर्णी चांदणी चौकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात दरम्यान मेधा कुलकर्णी यांच्यासोबत माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी मेधा कुलकर्णी यांनी बोलणे टाळले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest