मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, ते आमचे सरकार देईल : उदय सामंत
पुणे : वातावरण नक्की बिघडत चाललंय आहे. पण आम्हाला मराठा समाजाला (Maratha community) टिकणारे आरक्षण (Maratha Reservation) द्यायचे आहे. ते आमच सरकार देईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Politics News)
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन होत असताना काही ठिकाणी चिघळू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हेच मराठी समाजाला आरक्षण देऊ शकतील. पण संवाद बंद झाला तर कायदा सुव्यवस्था बिघडू शकते.
सामंत म्हणाले, डायमंड हिरे ज्वेलरी हब नवी मुबंईतच होईल. अन्य लोक टार्गेट करून बोलत आहे. गैरसमज निर्माण करत आहेत,सचिन वाझे याना पोलिस अधिकारी कोणी केले? सचिन वाझे बद्दल अग्रलेख छापून आला होता. यांची शिफारस करणाऱ्या चौकशी केली पाहिजे,जगाच्या मोठ्या उद्योजकांच्या घराखाली जिलेटीन कोणी ठेवले याचेही उत्तर द्यावे लागेल.