मावळात तिघांचे अर्ज बाद; ३८ पैकी ३५ अर्ज ठरले वैध

मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झालेले ३८ व्यक्तींनी केलेल्या अर्जांपैकी ३ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. कागपत्रांची पूर्तता न करणे तसेच, वेळेत डिपॉझिट न भरणे या कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी हा निर्णय दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Desk User
  • Fri, 26 Apr 2024
  • 02:42 pm
Maval Lok Sabha Constituency

संग्रहित छायाचित्र

मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Lok Sabha) दाखल झालेले ३८ व्यक्तींनी केलेल्या अर्जांपैकी ३ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. कागपत्रांची पूर्तता न करणे तसेच, वेळेत डिपॉझिट न भरणे या कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी हा निर्णय दिला आहे.

मावळ मतदार संघ अंतर्गत गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८ व्यक्तींनी ५० अर्ज दाखल केलेले होते. शुक्रवारी सकाळीच सुरू झालेल्या छाननी मध्ये यापैकी तीन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून बाद ठरवण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळवले देखील होते. मात्र त्यांनी वेळेत ते दाखल न केल्याने हे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

संजय वाघेरे (अपक्ष), राजेंद्र छाजछिडक आणि विजय ठाकूर अशी त्या तिघांची नावे आहेत. यापैकी वाघेरे यांनी वेळेत मतदार यादीची साक्षातिक प्रत दाखल केली नाही. तर, छाजछिडक प्रतिज्ञा पत्र जोडले नव्हते. तर, ठाकूर यांनी अनामत रक्कम न भरल्याने हे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest