Sharad Pawar : दुध दरवाढीची अंमलबजावणी तातडीने करा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच सरकारने दूर दरवाढीची अंमलबजावनी तात्काळ करावी, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

Sharad Pawar : दुध दरवाढीची अंमलबजावणी तातडीने करा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

दुध दरवाढीची अंमलबजावणी तातडीने करा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

अहमदनगरमधील अकोले येथे गेल्या सहा दिवसांपासून दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसह किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच सरकारने दूर दरवाढीची अंमलबजावनी तात्काळ करावी, अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

शरद पवार यांनी याबाबत त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करत म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे.

 

उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest