Politics : प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले? शरद पवारांचा हल्लाबोल

एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावे. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असे ऐकले आहे. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावे’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

Politics : प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले? शरद पवारांचा हल्लाबोल

प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले? शरद पवारांचा हल्लाबोल

प्रफुल पटेल पुस्तक यांचं पुस्तक कधी येते, याची मी वाट पाहत आहे. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावे. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असे ऐकले आहे. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

पुण्यातील निसर्ग कार्यालय येथे शरद पवार गटाची मोठी बैठक पार पडली. अजित पवार यांनी शुक्रवारी एक बैठक घेत यामध्ये लोकसभेच्या शिरूर, बारामती, रायगड आणि सातारा या जागा लढवणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शरद पवार यांनी देखील आमदार, खासदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजप बरोबर जायचे नव्हते. भाजपसोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपसोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना कधीच बोलावलं नाही.

दरम्यान, सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असे शरद पवार म्हणाल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. ज्या मागण्या केल्या होत्या त्या संबंधीची चर्चा झाली होती. मात्र तो रस्ता आम्हाला मान्य नव्हता. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मतं मागितली नव्हती. जी आमची भूमिका होती त्याला लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक आहे".

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest