मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन घ्या – रोहित पवार
मराठा आरक्षणा प्रश्नी (Maratha reservation) राज्यात गेल्या तीन दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. (Politics News) पण नेते याप्रकरणात काहीच बोलत नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पवार म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या करूनही नेते त्याकडं केवळ मूकपणे पाहणार आहेत का? केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने दोन्ही सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी."
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात गेल्या ३ दिवसांत ६ तरुणांनी आत्महत्या करूनही नेते त्याकडं केवळ मूकपणे पाहणार आहेत का?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2023
केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने दोन्ही सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी.…
"मी_पुन्हा_येईन चे स्वप्न पूर्ण करण्याच्या चर्चेत लोकांना फार काळ गुंतवून ठेवता येणार नाही.. नेत्याचं एखादं स्वप्न सामान्य नागरिक जसा पूर्ण करू शकतो तसाच तो स्वप्न उध्वस्तही करू शकतो, हे कुणीही विसरता कामा नये. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नसतात उलट आपलंच कुटुंब, आई-वडील, मुलं हे उघड्यावर पडतात, त्यामुळं कुणीही आत्महत्या करू नये, अशी मी सर्व युवांना विनंती करतो", असे आवाहनाही त्यांनी केले आहे.