Ajit Pawar : पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगू? नेमकं काय झालं ?

राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज भेट झाली. पुण्यात बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधु प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे.

Ajit Pawar : पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगू? नेमकं काय झालं ?

पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगू? नेमकं काय झालं ?

राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज भेट झाली. पुण्यात बाणेरमध्ये शरद पवार यांचे चुलत बंधु प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि पवार कुटुंबातील अन्य सदस्य आले होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रतापराव पवार यांचे बाणेरमध्ये निवासस्थ आहे. याभेटी दरम्यान, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो, अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती. मात्र, अजित पवार यांच्या दिल्लीत दौऱ्याबद्दल बोलणं शरद पवार यांनी टाळले. दरम्यान, अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, आता अचानक दिल्लीला रवाना झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest