Ajit Pawar : ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – अजित पवार

ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar : ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – अजित पवार

ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – अजित पवार

ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.

डेंग्यूमधून बरे झाल्यानंतर अजित कामाला लागले आहेत. आज ते पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. या दरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याची गरज आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न त्याचबरोबर कोयनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे या मागणीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आरक्षणाविषयीची भूमिका पक्षाच्या तीस आणि एक तारखेला होणाऱ्या कर्जत येथील अधिवेशनात स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पक्षाचे ३० आणि एक तारखेला कर्जत येथे अधिवेशन शिबीर होत आहे. त्यामध्ये मी माझी आरक्षनाविषयी भूमिका मांडेल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

भुजबळांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असताअजित पवारांनी उत्तर देताना म्हटले की, समाज समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य कोणीच करू नयेत. मात्र छगन भुजबळ यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? याबाबत त्यांनी कोणतेही थेट वक्तव्य केले नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest