रोहित पवारांना शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बुधवारी (दि. २४) चौकशीसाठी बोलावले आहे. ही कारवाई राजकीय आकसातून होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांना पूर्णपणे पाठिंबा

Rohit Pawar

संग्रहित छायाचित्र

आज ईडी चौकशी, रोहित पवार सुप्रिया सुळेंसोबत करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बुधवारी (दि. २४) चौकशीसाठी बोलावले आहे. ही कारवाई राजकीय आकसातून होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.

बारामती ॲग्रोमध्ये (Baramati Agro) कथित गैरव्यवहारप्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. त्यानंतर ईडीच्या वतीने रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार रोहित पवार यांना बुधवारी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.  यादरम्यान रोहित पवार यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित राहणार आहेत. तसेच रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयांवर मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. रोहित पवार या कंपनीचे संचालक आहेत. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यानंतर कंपनीवर छापेमारी करण्यात आली.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वात पक्षात फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पक्षात आपले स्थान मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. या ईडी चौकशीदरम्यानदेखील रोहित पवार समर्थनांमार्फत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीदेखील ईडी कार्यालयाभोवती गर्दी राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वय झालं म्हणून काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ईडीचे कार्यालय आहे. शरद पवार गट ईडी कार्यालयाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सर्वांच्या पाठिंब्यामुळे आपण भाऊक झालो असल्याची पोस्टर रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर केली आहे. ‘‘माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या सुप्रियाताई आणि स्वतः पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय!,’’ असे म्हणत रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest