Politics : दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे....? रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर सडकून टिका

दादा-दादा बोलता-बोलता यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला शुक्रवारी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला होता. यानंतर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे.

Politics : दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे....? रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर सडकून टिका

दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे....? रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर सडकून टिका

अजितदादांनी ३० वर्षात बारामती उभी केली. दादा-दादा बोलता-बोलता यांच राजकीय आयुष्य व्यतीत झालं, असा टोला शुक्रवारी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी सुप्रिया सुळेंना लगावला होता. यानंतर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेतून त्यांनी थेट नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात, त्यांनाच प्रश्न विचारतात...?, अशा शब्दांत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकरांनी पोस्ट केलेली कविता

तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न...?

 

दादासमोर नाक उचलून

धाकुटी विचारे

तू कुठं काय केलंस?

 

चंदनाच्या खोडाला

सहाण विचारे

तू कुठं काय केलंस?

 

तो झिजला, पण विझला नाही

देहाची कुडीच विचारे

तू कुठं काय केलंस?

 

पाया भरला, विटा-वासे तोलून धरले

घराचा उंबराच विचारे

तू कुठं काय केलंस?

 

नांगर धरला, शेती केली

भुईला भीमेचं भान दिलं

मुसक्यांची गाठ विचारे

तू कुठं काय केलंस?

 

घामाला दाम दिला

कष्टाला मान दिला

रक्ताचं पाणीच विचारे

तू कुठं काय केलंस? 

*- प.पा.

अशी कविता पोस्ट करत चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद सुरू आहेत. निवडणूक आयोगात याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप होत असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले होते सुनील तटकरे ?

“अजित पवारांनी ३० वर्षे बारामती शहर उभे केले. दादा… दादा… दादा म्हणत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest