Pune : हिटलरचा मोदींच्या रुपी पुर्ण:जन्म; पुण्यात झळकले पोस्टर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून तब्बल 141 खासदारांचे निलंबन (MP Suspension) करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आले आहे.

 Prime Minister Narendra Modi

हिटलरचा मोदींच्या रुपी पुर्ण:जन्म; पुण्यात झळकले पोस्टर

पुणे : संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून तब्बल 141 खासदारांचे निलंबन (MP Suspension) करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन करण्यात आले आहे. यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्षा संघटनेने पोस्टर लावले आहेत. या पोस्टर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांची तुलना थेट हिटलरशि (Hitlar) केली आहे. हिटलर रुपी मोदी सरकारच जाहिर निषेध असा आशाय या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदारांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आता त्याचे पडसाद पुण्यातही उमटू लागले आहेत. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात थेट मोदींची तुला हिटलरशी केल्याचे पोस्टर राष्ट्रवादीकडून लावण्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest