Dilip Valse-Patil : दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला, अंकुश काकडेंनी सांगितले कारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी एका खासगी बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आले होते. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शहरातील शरद पवार यांच्या मोदी बागेत असणाऱ्या कार्यालयात उपस्थिती लावल्याने मोठी चर्चा सुरू झाली.

 दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला

दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी एका खासगी बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आले होते. अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शहरातील शरद पवार यांच्या मोदी बागेत असणाऱ्या कार्यालयात उपस्थिती लावल्याने मोठी चर्चा सुरू झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेबाबत देखील चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व बैठकीबाबत अंकुश काकडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अंकुश काकडे म्हणाले की, बैठक पूर्व नियोजित होती, राजकीय नाही. पंधरा दिवस आधी ठरवलेली बैठक होती. दादांना वैद्यकीय सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. त्यामुळे ते दिवाळी पाडव्याला येतील असं सांगता येत नाही. आरोग्याची काळजी घेणं हे गरजेच आहे. पवार साहेबांची राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही स्पष्ट राहिलेले आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक काम करताना ते कधी राजकीय भूमिकामध्ये आणत नाहीत. आपल्या विरोधी गेला म्हणून पवार साहेबांनी आजपर्यंत कुठल्याही संस्थेत लोकांना विरोध केलेला नाही. रयत शिक्षण संस्था आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र हे देशातला असे एकमेव राज्य आहे जिथे आपण राजकीय अस्पृश्यता पाळत नाही या गोष्टीकडे राजकीय दृष्ट्या पाहू नये असे विनंती आहे, असेही अंकुश काकडे म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest