देवेंद्र फडणवीस, बावनकुळे दिल्लीला रवाना..! मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता
मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा केंद्राकडून सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना दिल्लीला बोलावले असल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वेळात ही बैठक पार पडणार असून राज्यातील दोन्ही नेते काही वेळात तिथे पोहचणार आहेत.
मनोज जरांगे उपोषणावर ठाम असल्याने आता केंद्राने यात लक्ष घातल्याची माहिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३०७ चे गुन्हे दखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर टीका होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.