Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ‘दादागिरी’, १०९ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा करिष्मा

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election) निकाल आज जाहीर झाला. २२९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाने १०९ जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 6 Nov 2023
  • 07:44 pm
Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात ‘दादागिरी’, १०९ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा करिष्मा

पुणे जिल्ह्यात ‘दादागिरी’, १०९ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाचा करिष्मा

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election) निकाल आज जाहीर झाला. २२९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत अजित पवार गटाने १०९ जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीचा (Pune News) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पुन्हा एकादा दादांचे करिष्मा (Ajit Pawar) पाहायला मिळणार आहे. तर त्यापाठोपाठ ३४ जागांवर विजय मिळवून भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. त्यामधील २३१ ग्रामपंचायती पुणे जिल्ह्यातील होत्या. मात्र, २३१ पैकी २ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने २२९ ग्रामपंयतींचा आज (सोमवारी) निकाल जाहीर कऱण्यात आला. यामझध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली नसल्याचे दिसत आहे.

पुण्यातील २२९ ग्रामपंचायतींपैकी अजित पवार गटाने १०९ जागेवर विजय मिळविली. तर ३४ जागांवर भाजपने विजय मिळवला. त्यापाठोपाठ काँग्रेसने २५, शिंदे गट १०, ठाकरे गट १३, शरद पवार गट २७, इतर ११ अशा एकूण २२९ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, रद्द झालेल्या दोन जागा रिक्त आहे. यामध्ये एक मुळशीमध्ये तर एक भोरमधील आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या काटेवाडी गावात भाजपने एन्ट्री केली आहे. भाजपने काटेवाडीतील सदस्य पदाच्या दोन जागा पटकावल्या.

काटेवाडीतील निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यंदा येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात राज्यातील सत्तेत सहभागी असणारे शिंदे-फडणवीस व पवार या तिन्ही गटाचे उमेदवार रिंगणात होते. निवडणूक कालावधीत पैसे वाटपावरून मोठे आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु अखेरीस अपेक्षेप्रमाणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराने सरपंचपदी बाजी मारली. भाजपने एन्ट्रीकरूनही सरपंचपद मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडेच कायम राहिले.

दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. नारायणगाव ग्रामपंचयातमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली. १७ पैकी १६ उमेदवार विजय झाले. तसेच शिरूर तालुक्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. सर्वांत मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. याशिवाय, अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांना जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मोठा धक्का सहन करावा लागला. आपल्याच होम ग्राऊंडवर त्यांना पराभव स्विकारावा लागला. दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे.

 

निवडणूक झालेल्या : २२९

पक्षनिहाय निकाल

>>भाजप : ३४

>>शिंदे गट : १०

>>ठाकरे गट : १३

>>अजित गट : १०९

>>शरद गट : २७

>>काँग्रेस : २५

>>इतर : ११

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest