काँग्रेसची गटबाजी ! धंगेकरांची डोकेदुखी ; केंद्रीय पथक दाखल

विधानसभेच्या पोट निवडणुकीत धंगेकरांनी भाजपला धुळ चारली. तेव्हा पासून धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. लोकसभेला त्याचीच पुनरावृत्ती करुन भाजपला आस्मान दाखविण्याचा निश्चय कॉंग्रेससह महाविकास आघाडीने केला आहे.

Ravindra Dhangekar

काँग्रेसची गटबाजी ! धंगेकरांची डोकेदुखी ; केंद्रीय पथक दाखल

पुणे: विधानसभेच्या पोट निवडणुकीत धंगेकरांनी भाजपला धुळ चारली. तेव्हा पासून धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत. लोकसभेला त्याचीच पुनरावृत्ती करुन भाजपला आस्मान दाखविण्याचा निश्चय कॉंग्रेससह महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळेच पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रसने आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच कॉग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अद्यापही ही नाराजी दूर झालेली नसल्याने धंगेकरांपुढे कॉंग्रेसच्याच नेत्यांचे आव्हान कायम राहिल्याने अखेर कॉंग्रेसचे केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले असून पक्ष विरोधी काम करणाऱ्या नेत्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. (Loksabha Election 2024)

कॉंग्रेसने लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले होते. त्यावेळी तब्बल २३ जणांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नेमके कोणाला उमेदवारी देयची असा प्रश्न कॉंग्रेसपुढे उभा राहिला होता. असे असतानाच पु्ण्यात दमदार नेता म्हणून धंगेकरांचेच पारडे जड होते. त्यात जनमाणसातून धंगेकरांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. तसेच भाजपचे उमेदवार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करायचे असेल तर धंगेकर हा एकमेव पर्याय होता. आपेक्षेप्रमाणे धंगेकरांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. 

कॉंग्रेसच्या राज्याचे निवडणूक प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात पुण्यातील नेत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी कोणतीही अंतर्गत नाराजी नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र धंगेकरांच्या प्रचारात दिसून येत नाही. असे चित्र दिसून येत आहे. याची गंभीर दखल काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष निरीक्षक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती संकलित केली जाणार असून ती केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार असण्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले आहे. 

निरीक्षक पथकाची अशी असेल जबाबदारी 

- पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर ठेवले जाणार लक्ष

- काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करणार 

- उत्तर भारतीय मतदारांना मतदानाच्या दिवशी थोपवण्याचे काम करावे लागणार  

- पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार असून उत्तर भारतीयांकडून मतदार करुन घेण्याचे काम करावे लागणार 

भाजपमध्येही नाराजी...? 

 भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन पुणेकरांचे लक्ष वेधले होते. पुणे लोकसभेसाठी आपणच उमेदवार असणार असल्याचे चित्र त्यांनी उभे केले होते. तर दुसरीकडे मोहोळ यांनी देखील मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन आपलीच उमेदवारी पक्की असल्याचे ठासून सांगितले होते. भाजपच्या नेत्यांची मर्जी राखण्यात मोहोळ यांना यश आले आणि आपेक्षेप्रमाणे त्यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर मोहोळ यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तसेच पक्षाकडून आढावा बैठका घेतल्या जात आहेत. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांना मुळीक हे उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर भाजपमधील नाराजी ही उघड झाली होती. मात्र, सध्या तरी भाजपाला अंतर्गत नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात यश आले असल्याचे दिसून येते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest