संग्रहित छायाचित्र
संतोष मोरे
मुंबई : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५ डिसेंबर) नागपुरात दुपारी 4 वाजता होणार आहे. पहिल्या विस्तारात महायुतीचे तब्बल ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यामध्ये साहजिकच भाजपचे सर्वाधिक आमदार असणार आहेत. भाजप आपल्या कोट्यातील काही मंत्रिपदाच्या जागा रिक्त ठेवणार असून शिवसेना मात्र सर्व जागा भरणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्या कोट्यातील सर्व मंत्रिपदे भरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळ हे शिवसेनेतून १९९१ मध्ये शिवसेनेतल्य फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता. त्यानंतर आता तब्बल 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविर्ध नागपुरात होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी देखील काही वर्षांपूर्वी शिवसेनेतून फूट पडून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार शपथ घेणार आहे.
महायुतीने ठरविल्याप्रमाणे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ उद्या दिसणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ६ आमदारवर एक मंत्री असा निर्णय महायुतीच्या नेत्यानी घेतला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे २१ मंत्री तर शिवसेनेच्या १२, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० मंत्री असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदं मिळणार आहे.
असा असणार आहे महायुतीचा खातेवाटप!
माहितीनुसार भाजपकडे गृह, नगर प्रशासन व शहरी विकास, विधी आणि न्याय, गृहमंत्री निर्माण, ऊर्जा, राज शिष्टाचार, सिंचन, ग्राम विकास, पर्यटन, कौशल्य विकास, सामान्य प्रशासन आणि आदिवासी विभाग असू शकते. तर शिवसेना (शिंदे) ला महसूल, सामाजिक न्याय, पर्यावरण, खाण, जल पुरवठा, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दिले जाऊ शकते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) ला अर्थ आणि नियोजन, अन्न आणि पुरवठा, एफडीए, कृषी, महिला आणि बाल विकास, क्रीडा आणि युवा कल्याण आणि मदत आणि पुनर्वसन विभाग मिळू शकते.
महायुतीचे संभाव्य मंत्री पुढील प्रमाणे
भाजप : रविंद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
शिवसेना : उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, योगेश कदम, विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक सना मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
'या' दिग्गजांचा पत्ता कट होण्याची शक्यता
सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.