Loksabha Election 2024 : भाजपचे लाड केले आता कॉंग्रेसचे सुरु, कसबा मतदार संघावर आता मशाल पेटवणार

भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि शिवसेना (Shivsena) हे मित्रपक्ष होते. या मैत्रीतून कसबा विधान सभा (Kasbah Legislative Assembly) मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान करुन प्रचार केला जात होता.

Loksabha Election 2024

भाजपचे लाड केले आता कॉंग्रेसचे सुरु, कसबा मतदार संघावर आता मशाल पेटवणार

पुणे: भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि शिवसेना (Shivsena)  हे मित्रपक्ष होते. या मैत्रीतून कसबा विधान सभा (Kasbah Legislative Assembly)  मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान करुन प्रचार केला जात होता. भाजपचे अनेक लाड पुरवले आहेत. आता कॉंग्रेसचे लाड केले जात आहेत. पु्ण्यातून कॉंग्रेसचा (Congress) उमेदवार लोकसभेत जाणार आहे. त्यामुळे कसबा विधानसभेच्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचाच दावा केला जाणार असल्याचे आज पुन्हा एकदा पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही बाब उबाठाच्या वरिष्ठ नेत्यांना दिली असल्याचेही सांगितले. (Loksabha Election 2024) 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात  शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर दुपारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी आम्ही कसबा विधान सभेला जीवाचे रान करुन प्रचार केला. आताही लोकसभेचा प्रचार करु आणि धंगेकरांना विजय मिळवून देऊ. मात्र विधान सभेच्या निवडणूकीला कसबा मतदार संघ उबाठाला द्या. अशी थेट मागणी केल्याची माहिती समोर आली होती. उबाठाने आतापासूनच कसबा मतदार संघाच्या जागेवर दावा केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला  होता. त्यानंतर आज दिवसभर पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच होते. अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत या मागणीला दुजोरा दिला.

पुणे लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे आणि कसबा विधान सभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही झाले तरी धंगेकर यांनी निवडणूक आणण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे मित्र पक्षांना सोबत घेत बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. अशाच एका बैठकीत आम्ही लोकसभेला प्रचार करतो, कसबा विधानसभा मतदार संघ आम्हाला द्या, अशी माहिती समोर आल्याने महाविकास आघाडीमध्ये आताच बिघाडी झाली की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र प्रचारच करणार नाही, असे कोणतेही वक्तव्य उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी केले नाही. त्यामुळे विनाकारण कोणतीही अफवा पसरवण्यात येऊ नये, असे पदाधिकारी बोलत होते. मात्र कसबा मतदार संघावर दावा ठाम असल्याचे ते ठासून सांगत होते.

कसबा मतदार संघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. या निवडणुकीत त्यांचा विजय होणार आहे. त्यामुळे ही जागा मोकळी राहणार आहे. या जागेसाठी शिवसेनेची मागणी अनेक दिवसांपासुन मागणी होती. त्यामुळे आता या जागेवर उबाठा शिवसेनेने दावा केला आहे. खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर ही गोष्ट सांगितली आहे. ठाकरे गटाची मशाल कसबा मतदार संघात घरोघरी पोहचविण्याचे काम केले जाणार आहे.

 - संजय मोरे, शहर प्रमुख, शिवसेना (उबाठा).

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest