BJP Pune : टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, पुण्यात भाजप आक्रमक

उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा पुणे शहर भाजपकडून देण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

BJP Pune : टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, पुण्यात भाजप आक्रमक

टिपू सुलतानचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, पुण्यात भाजप आक्रमक

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी कृल्ये केली जात असल्याचे दिसते. केवळ धर्म वेगळा होला म्हणून ज्याने येथील नागरिकांवर अत्याचार केले, त्याच्या उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा पुणे शहर भाजपकडून देण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी निवेदन देऊन टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्यांना वेळीच आवर घालण्याची मागणी केली आहे.

भाजपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सन १७८८ मध्ये कुर्गवर कब्जा मिळवताना ज्याने हजारों निष्पाप लोकांचे जीव घेतले. गावातील अनेक घरे जाळली, उद्‌ध्वस्त केली, मलाबारवर कब्जा मिळवण्यासाठीही अशाच पद्धतीने शेकडो घरे मातीमोल करण्यात आली. रस्त्यात येणान्या प्रत्येक वास्तूवर हल्ला चढविण्यात आल्या. घरातील पुरुषधा-या मंडळींना, स्त्रीयांना झाडावर फासावर लटकविण्यात आले. लहान मुलांनाही सोडण्यात आले नाही. मुस्लिम नसलेल्या हजारो लोकांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हे सगळे ज्या धूर्त व्यक्तीने केले, त्या टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करण्याचे काम पुण्यातील काही नतद्रष्ट लोकांकडून करण्यात येत आहे.

पुण्यातील काही भागांमध्ये क्रूर टिपू सुलतान याची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. त्यानिमित्त स्पीकर लावण्यात आले होते. त्याचा गौरव करणारे पोस्टर लावण्यात आले. व्हॉट्सअॅप मेसेजे एकमेकांना पाठविण्यात आले. पुण्याच्या संस्कृतीला हे अजिबात शोभेसे नाही. टिपू सुलतान हा क्रूर प्रशासक होता. त्याने कर्नाटकमध्ये हिंदूवर अनन्वीत अत्याचार केले. आपल्या सैनिकांकडून नृशंस हत्याकांड घडवून आणले. अनेक कुटुंबांना फासावर लटकविले, त्याचा गौरव कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित होतो.

 

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी कृल्ये केली जात असल्याचे दिसते. केवळ धर्म वेगळा होला म्हणून ज्याने येथील नागरिकांवर अत्याचार केले, त्याच्या उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही.

आपण या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा आणि यामागे नक्की कोण लोक आहेत, याचा शोध घ्यावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. पुण्यातील शांतता बिघडेल, अशा गोष्टींना अजिबात थारा दिला जाऊ नये. पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करावा, अशी आमची मागणी आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कनिष्ठ अधिकान्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती आम्ही करतो, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest