Politics : आ देखे जरा, किसमे कितना है दम ? पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यालय आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली आहेत. दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली असली तरी एक गट सत्ताधारी आहे, तर दुसरा गट विरोधक म्हणून बसला आहे.

Politics : आ देखे जरा, किसमे कितना है दम ? पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यालय आमने-सामने

आ देखे जरा, किसमे कितना है दम ? पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे कार्यालय आमने-सामने

भाजपविरोधात कोण कसा लढा देणार याची उत्सुकता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली आहेत. दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर आली असली तरी एक गट सत्ताधारी आहे, तर दुसरा गट विरोधक म्हणून बसला आहे. त्यामुळे शहरातील समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रस्थापित भाजपासोबत दोन्ही गटांपैकी कोणाला अधिक यश मिळते यावरच त्यांच्यातील सामर्थ्य सिद्ध होणार आहे.

अजित पवार गट सत्तेत शहरातील प्रस्थापित भाजप विरोधातील लढा कसा देणारसत्तेत भागीदार असताना हा गट  भाजप विरोधात लढा उभारणार का, हे प्रश्नही उत्सुकतेचे ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या गटाचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला मेळावा शनिवारी (२ डिसेंबर) होणार आहे. पिंपरीतील मैदानात हा मेळावा होणार असून, पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचेही उद्घाटन केले जाणार आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात पक्षाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे भाजप दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना स्व खर्चाने विकत घेतलेल्या कार्यालयातच अजित पवार गटाचे कामकाज चालवले जात आहे.

शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चौकातील शनी मंदिराशेजारी उभारण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करून कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

मोठा गट घेऊन सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील पक्ष संघटना, आमदार, बहुतांशी माजी नगरसेवकांनीही त्यांना साथ दिली आहे. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष घातले असून, आमदार रोहित पवार यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जुन्या पुणे-मुंबई महार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणा-या सेवा रस्त्यावर खराळवाडीत अजित पवार गटाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी विकत घेतलेल्या कार्यालयातून कारभार चालविला जात आहे, तर बरोबर याच कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला महामार्गावरून निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरीत शरद पवार यांच्या गटाने नवीन कार्यालय घेतले आहे. दोन्ही पक्षांची कार्यालये समोरा-समोर असल्याने भविष्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता असून, भविष्यात दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शरद पवार गटाकडे युवा कार्यकर्त्यांचा ओढा अधिक असून, पिंपरी-चिंचवडमधील नेते मात्र अजित पवार गटाकडे वळले आहेत. अजित पवार यांच्या गटाची धुरा आमदार अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यावर आहे, तर शरद पवार गटाची धुरा माजी महापौर आझम पानसरे आणि शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यावर आहे.

आमचे कार्यालय हे केवळ कार्यकर्त्यांसाठी नाही तर सर्वसामान्य नागरिकांसाठी असणार आहे. या कार्यालयातून नागरिकांची सर्व प्रकारची कामे केली जाणार आहेत. आमच्या कार्यालयासमोर कोणाचे कार्यालय आहे याची आम्हाला माहिती नाही. नागरिकांची कामे महापालिकेशी निगडित असतात. त्यामुळे महापालिकेच्या जवळ कार्यालय असावे असे सर्वांचे मत होते. त्यामुळे त्यानुसार नवीन मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत चार भिंतींच्या आत पदाधिकारी ठरवले जात होते. आमचे पदाधिकारी मेळाव्यात जाहीर होणार असून, महापालिकेच्या आगामी निवडणुकांचे उमेदवारदेखील यावेळी प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या उपस्थित निश्चित केले जाणार आहेत.

- तुषार कामठे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest