Diwali 2023 : आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ? दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या

दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत.

Diwali 2023 : आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ? दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या

आनंदाचा शिधा की गोरगरिबाची क्रुर थट्टा ? दिवाळीच्या शिध्यामध्ये किडे अन् जाळ्या

दिवाळी सणानिमित्ताने सरकारने सामान्य नागरिक, गोरगरीबांना शिधावाटप केला आहे. आनंदाचा शिधा या संकल्पनेतून सरकारने ही भूमिका घेतली आहे. केवळ १०० रूपयांच्या दरात हा शिधा वाटप केला जात होता. मात्र या शिधामध्ये आळ्या, किडे आढळून येत आहेत. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. सरकारने गरिबांची क्रुर थट्टा केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दिवाळीत फराळ बनवण्यासाठी सरकारकडून ‘आनंद शिधा’ संकल्पनेच्या माध्यमातून शिधा वाटप करण्यात आला होता. यासाठी अनेक सामान्य नागरिकांनी या शिधाचा लाभही घेतला. मात्र या शिधापासून माणसांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. सरकारने केवळ शिधा वाटप करण्याच्या जाहिराती केल्या आहेत, मात्र याचा दर्जा कसा आहे, हे न पाहताच सामान्य जणांना शिधा वाटण्यात आला. याची पडताळणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत खुलासा केला आहे.

 

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला 'आनंदाचा शिधा' हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले.‌ हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध. अशा शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest