लग्नासाठी त्याने मागितला तब्बल ५० कोटींचा हुंडा; एम्सच्या डॉक्टरने काढली लाज, पोस्ट व्हायरल

एम्सच्या डॉक्टरने लग्नासाठी तब्बल ५० कोटींच्या हुंड्याची मागणी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 01:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एम्सच्या डॉक्टरने लग्नासाठी तब्बल ५० कोटींच्या हुंड्याची मागणी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे.

यामध्ये डॉक्टर फिनिक्स नावाच्या ट्विटर हँडलअसलेल्या एका महिला यूजरने दावा केला आहे की, तिच्या मित्रिणीला एम्सच्या एका उच्चपदस्थ युरोलॉजिस्टकडून हुंड्यापोटी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पोस्टनुसार, ज्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते, ती हैदराबादमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट अॅनेस्थेसिया स्पेशालिस्ट आहे.

या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एम्समधील एका डॉक्टरनं त्याच्या लग्नासाठी हुंड्यापोटी ५० कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे उभे करण्यासाठी मुलीने आपली संपूर्ण कमाई पणाला लावण्याचे तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वत: डॉक्टर आहे. याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत डॉक्टरवर टीका केली आहे.  एवढ्या पैशांचे  डॉक्टर काय करणार, असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.

डॉक्टर मुलाच्या या मागणीमुळे मुलीला चांगलाच धक्का बसला असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. ही मोठी रक्कम उभी करण्याच्या तयारीत मुलीचे कुटुंबीय गुंतले होते. मुलगा आणि मुलगी दोघेही तेलुगू कुटुंबातील आहेत. तेलुगू समाजात हुंडा पद्धत सक्तीची आहे, असा मुलीच्या कुटुंबीयांचा युक्तिवाद आहे. पोस्ट करणाऱ्या महिलेने लिहिलं आहे की, शेवटी हुंडा घ्यायचा असेल तर एवढे शिक्षण, गुणवत्ता आणि पदाचा काय उपयोग. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest