संग्रहित छायाचित्र
तिरुवनंतपूरम : वाहनचालकांच्या अगदी किरकोळ चुकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अशीच एक घटना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सोबत घडली आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या ताफ्याचा सोमवारी संध्याकाळी अपघात झाला.
विजयन कोट्टायमहून तिरुअनंतपूरमला परतत होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास वामनपूरम पार्क जंक्शन येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे जात असताना अचानक एक स्कूटर चालवणारी महिला कारसमोर आली. महिलेने स्कूटर अचानक वळवल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांनी ब्रेक लावला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या.
अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आपापल्या कारमधून ताफ्यातून खाली उतरले. त्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
अपघातानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे धावले. वैद्यकीय कर्मचारीही रुग्णवाहिकेतून बाहेर आले आणि मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ पोहोचले. ताफ्यातील रुग्णवाहिका, वैद्यकीय कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने वामनपूरम पार्क जंक्शनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्यमंत्री विजयन जखमी झाले नाहीत याची खात्री केली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकाही होती.
पोलीस विभागाने अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला. पोलीस महिला स्कूटर चालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की महिलेने अचानक स्कूटर का वळवली.
नेमकी अशी घडली घटना
स्कूटी अचानक वळल्याने पाठीमागून येणाऱ्या दोन गाड्यांनी अचानक ब्रेक लावला, त्यानंतर ताफ्यातील वाहनांनाही अचानक ब्रेक लावून थांबावे लागले. स्कूटी अचानक वळल्याने पाठीमागून येणाऱ्या दोन गाड्यांनी अचानक ब्रेक लावला, त्यानंतर ताफ्यातील वाहनांनाही अचानक ब्रेक लावून थांबावे लागले. स्कूटी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोरील कार गेली, मात्र ताफ्यातील सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या.