'कूक'कडेही आहे स्वतःचा 'कूक'; बंगळुरूतील माणसाची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

बंगळुरू येथील माणसाने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. २७ वर्षांच्या या माणसाने सांगितले आहे माझ्याकडे कूक म्हणून काम करणाऱ्याकडे स्वतःचा कूक म्हणजेच स्वतःचा स्वयंपाकी आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बंगळुरू येथील माणसाने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. २७ वर्षांच्या या माणसाने सांगितले आहे माझ्याकडे कूक म्हणून काम करणाऱ्याकडे स्वतःचा कूक म्हणजेच स्वतःचा स्वयंपाकी आहे. माझा स्वयंपाकी माझ्यासाठी अन्न शिजवतो आणि माझ्या स्वयंपाक्याचा स्वयंपाकी त्याच्यासाठी अन्न शिजवतो. एवढेच नाही तर त्याचा कूक त्याला भांडी घासण्यातही मदत करतो.

बंगळुरूतल्या या २७ वर्षीय तरुणाने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, माझ्या कूकला मी विचारले की, माझे घर रोज स्वच्छ करण्यासाठी, झाडपूस करण्यासाठी कुणी आहे का? एखादी गृहसेविका वगैरे ? त्यावर तो म्हणाला आहे पण ती या कामाचे महिन्याला ३ हजार रुपये घेईल. घर स्वच्छ करेल आणि भांडी घासेल. मी त्याला सांगितले की,  मागच्या वेळी मी माझ्या घरात होतो तो छोटा टू बीएचके फ्लॅट होता.  त्या ठिकाणी जी गृहसेविका यायची ती महिन्याचे २ हजार रुपये घेत होती. त्यावर माझ्या कूकने मला सांगितले की, त्याच्या घरी जी घरकाम करणारी बाई येते ती महिन्याला २ हजार रुपये घेते. तसेच तो त्याच्या स्वयंपाक्याला २५०० रुपये महिना देतो. त्याचे म्हणणे ऐकून मी उडालोच. कारण तो १ हजार रुपये मागत होता, त्यावरूनही मी त्याच्याशी घासाघीस केली होती. पण बंगळुरूत काहीही घडू शकते यावर माझा विश्वास बसला, असे या माणसाने म्हटले आहे. रेडइटवर ही पोस्ट लिहिली आहे.

पोस्ट वाचून कमेंटचा वर्षाव
रेडइटवर ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट येत आहेत. तुमच्या घरातला कूक आणखी काही वेगळा व्यवसायही करतो आहे का? त्याने तुम्हाला गृहसेविका किती पगार घेते ते सांगितले पण त्यात त्याचे २० टक्के कमिशन असेल. तुमच्या कूककडे खरेच कूक आहे का? तुमच्या स्वयंपाकी माणसाकडेही जर कूक असेल तर त्यालाही शोधा. अशा कमेंट सोशल मीडियावर पडत आहेत. एकाने लिहिले आहे की, माझ्या कारचा पूर्वीचा चालक स्कोडा रॅपिडने यायचा. आता तुम्ही कुणाचे तरी कूक व्हा, असा सल्लाही काहींनी या २७ वर्षीय तरुणाला दिला आहे. कूककडे असलेला कूकही चांगला स्वयंपाक करत असेल, असेही काहींनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest