राजस्थानमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी मोठा अपघात, बस पुलाला धडकली, १२ प्रवाशांचा मृत्यू

धनत्रयोदशीच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात अपघात घडला. देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. मात्र एका पुलाला धडकल्याने झालेल्या अपघातात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 1 Nov 2024
  • 02:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

संपूर्ण देशात दिवाळीचा सण उत्साहात आनंदात साजरा होत असताना या आनंदाच्या वातावरणाला गालबोट लावणारी घटना राज्यस्थानमध्ये घडली आहे.  धनत्रयोदशीच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात अपघात घडला.  देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. मात्र एका पुलाला धडकल्याने झालेल्या अपघातात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

मंगळवारी दि. २९ रोजी दुपारी ही घटना घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.  जखमींना लक्ष्मणगड आणि सीकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाच्या भिंतीला धडकल्याने बसचे मोठे नुकसान झाले. बसच्या समोरील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. धडक जोरदार असल्याने बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघातात बसमधील १२ जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसह अनेक लोक घटनास्थळी पोहोचले. सीकरचे खासदार अमरा रामदेखील घटनास्थळी पोहोचले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि अनेक नेत्यांनी या अपघाताच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘सीकरच्या लक्ष्मणगढ भागात बस दुर्घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना.’

- भजनलाल शर्मा, मुख्यमंत्री राजस्थान

Share this story

Latest